नाणेस ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र जोशी विजयी…

संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन केलं अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२९-:
नाणेस ग्रामपंचायत सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना पक्षाचे उमेदवार रवींद्र भाऊराव जोशी यांनी ५८ मतांनी विजय मिळवला. या विजयामुळे परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या विजयानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी रवींद्र जोशी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय जोशी, रघुनाथ जोशी, ज्ञानदेव जोशी, अनिश जोशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणुकीतील या यशामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद अधिक बळकट झाल्याची चर्चा होत आहे.

You cannot copy content of this page