⚡दोडामार्ग,ता.२९-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार वैभव नाईक यांचे गुरुवार, दि. 30 एप्रिल रोजी दोडामार्ग येथे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
सकाळी 10.30 वाजता दोडामार्ग बाजारपेठेतील मुख्य चौकात त्यांचे आगमन होणार असून, त्याठिकाणी स्वागत सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता शिवसेना तालुका संपर्क कार्यालयात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही होणार आहेत.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. वैभव नाईक यांच्या निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुका प्रमुख संजय गवस यांनी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, बेसिक, महिला व युवा कार्यकर्ते, तसेच सरपंच व उपसरपंच यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
माजी आमदार वैभव नाईक यांचे दोडामार्गात उद्या भव्य स्वागत…
