श्री पंचम खेमराज महाविद्यालयात अॅड प्रमोद प्रभू आजगावकर यांना श्रद्धांजली .
सावंतवाडी ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी संचालक अॅडव्होकेट प्रमोद प्रभू आजगावकर यांचे दि२५ रोजी मुंबई येथे दु:खद निधन झाले..अॅडव्होकेट प्रभू आजगावकर हे मनमिळावू सेवाभावी व्यक्तिमत्त्व होते.त्यांनी संस्थेला वेळोवेळी कायदेशीर सल्ला दिला. महाविद्यालयाच्या विविध कार्यक्रमामध्ये ते नेहमी हजर असत. विद्यार्थ्यांना , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना ते सतत मार्गदर्शन करीत असत. राजघराण्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती….
