तालुका मैदानी स्पर्धेत नेमळे विद्यालयाचा डंका
सात खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड ⚡सावंतवाडी ता.१७-: बांदा येथे झालेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सात खेळाडूची जिल्हास्तरावर निवड झाली .१४ वर्षाखालील मुलांच्या गटात गोळाफेक स्पर्धेत सोहम मडवळ याने ९.७८ मि.गोळा फेकून तालुक्यात प्रथम आला. या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.१४ वर्षाखालील मुलांच्या गटात पांडूरंग पाटकर याने थाळीफेक स्पर्धेत २४.६२…
