सावंतवाडीतील नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा शिवसेनेकडून सत्कार

जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते गुणाजी गावडे यांचा सत्कार : गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची दिली ग्वाही

⚡सावंतवाडी ता.१६-: शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ग्रामपंचायतींना भेट दिली. यावेळी त्यांनी वेत्ये येथील नवनिर्वाचित सरपंच गुणाजी गावडे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा आश्वासन श्री दूधवडकर यांनी गुणाजी गावडे यांना दिले.

You cannot copy content of this page