⚡मालवण ता.१६-: श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांच्या ८६ व्या जयंतीचे औचित्य साधून श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाऊंडेशन मालवण व डॉ. श्री. सी. कुडाळकर हायस्कूल मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये रंगभरण स्पर्धा गट क्र.- १ पहिली ते दुसरी, गट क्र. २ तिसरी ते चौथी, हस्ताक्षर स्पर्धा पाचवी ते सातवी – पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा ( मराठीमध्ये), आठवी ते दहावी- पसायदान, चित्रकला स्पर्धा – पाचवी ते सातवी- १. शाळेतील प्रजासत्ताक दिन २. आम्ही किल्ला बनवितो, आठवी ते दहावी- १. प्लास्टिकमुक्त अभियान राबविताना मुले, २. कुटुंब, निबंध स्पर्धा – पाचवी ते सातवी – १. संस्काराने घडतो माणूस २. मी शेतकरी बोलतोय. आठवी ते दहावी- १. माझा देश माझे संविधान २. तिरंगा माझा, वक्तृत्त्व स्पर्धा- १. आई खरच काय असते २. मला पडलेले सुंदर स्वप्न, आठवी ते दहावी- १. ऑनलाईन शिक्षण तारक की मारक २. कोरोना एक वैश्विक महागुरू. वक्तृत्व स्पर्धेचे शाळास्तरावर आयोजन करून प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याचे नाव २५ जानेवारी २०२३ पर्यंत कळविण्यात यावे. अंतिम वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन डॉ. कुडाळकर हायस्कूल मालवण येथे आयोजित करण्यात येईल. शाळास्तरावर रंगभरण, हस्ताक्षर, निबंध व चित्रकला या स्पर्धांचे आयोजन करून प्रत्येक शाळेने प्रथम तीन क्रमांकाची नावे आवश्यक साहित्यासह २५ जानेवारीपर्यंत आयोजकांकडे सादर करावीत. विजेत्यांना ७५० रुपये, ५०० रुपये, ३०० रुपये तर उत्तेजनार्थ दोन क्रमांकाना १०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
