Headlines

पंचायत समिती बैठकीत कर्मचाऱ्याचा ‘मटका’ कारनामा व्हायरल…

लोकहिताच्या चर्चेदरम्यान मोबाईलवर आकडे पाहण्यात गुंतला कर्मचारी; सभापती व उपसभापतींकडून कारवाईचे संकेत.. ⚡सावंतवाडी ता.२१-: पंचायत समितीच्या बैठकीत लोकहिताच्या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा सुरू असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा एक जबाबदार कर्मचारी आकडेमोड करण्यात व्यस्त होता.‌ मोबाईलवर ‘मटक्याचे आकडे’ पाहण्यात तो मग्न असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी…

Read Full News

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-: जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात एकजूट राहण्याची शपथ घेत समाजात शांतता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा निर्धार व्यक्त केला.कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या, दहशतवाद ही मानवतेसाठी अत्यंत घातक प्रवृत्ती असून…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाट्न संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या सहकार्याने दि. २०, आणि २१ मे २०२६ रोजी नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह वेंगुर्ला येथे दोन दिवसीय भव्य “सांस्कृतिक महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. वेंगुर्ला शहराच्या सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत विविध कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने…

Read Full News

अत्याधुनिक नेत्र तपासणी वाहनाचे २८ मे रोजी लोकार्पण…

नव सिंधुदुर्गच्या लाभार्थ्यांना साड्या व टी-शर्टचे वाटप; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन.. सावंतवाडी, ता.२१: भटवाडी येथील नव नेत्र रुग्णालयाच्या सेवेत आता अत्याधुनिक नेत्र तपासणी वाहनाची भर पडली असून, या वाहनाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन गुरुवार, २८ मे रोजी सकाळी ११.३० वाजता करण्यात आले आहे. अमेरिकास्थित प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. देवदत्त आणि डॉ. सुरेखा मिशाला यांनी दिलेल्या उदार देणगीतून…

Read Full News

सावंतवाडी तालुका काँग्रेसकडून राजीव गांधी यांना अभिवादन…

⚡सावंतवाडी, ता.२१ -: भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने आज काँग्रेस कार्यालयात त्यांना भावपूर्ण आदरांजली व पुष्पांजली वाहण्यात आली. २१ मे १९९१ रोजी झालेल्या त्यांच्या आकस्मिक निधनाने देशाचे आणि काँग्रेस पक्षाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले, अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. राजीव गांधी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात…

Read Full News

सावंतवाडीचे ऐतिहासिक घड्याळ दुरुस्त करा…

महिलांची नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्याकडे मागणी:प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, नागरिकांची अपेक्षा.. ⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारलेले आणि शहराची ओळख मानले जाणारे ऐतिहासिक घड्याळ गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहराची जान, शान आणि मान समजले जाणारे हे घड्याळ नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे…

Read Full News

कणकवली नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आचारसंहितेमुळे रद्द…

पुढील तारीख लवकरच कळविली जाणार असल्याचे प्रशासनाची माहिती.. ⚡कणकवली ता.२०-: कणकवली नगरपंचायतीतर्फे इयत्ता दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आयोजित करण्यात आलेला सत्कार समारंभ आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. अशी माहिती नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी गुरुवार दि….

Read Full News

मठ एरियातील दुसऱ्या बाजूच्या साईडपट्टीचे काम त्वरित करण्यात यावे…

सरपंचा रुपाली नाईक यांची सा. बां. विभागाकडे मागणी. ⚡वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी – कुडाळ हा महत्वाचा मार्ग आहे. या रस्त्याच्या एका बाजूचे साईडपट्टीचेही काम करण्यात यावे, अशी मागणी मठ सरपंचा सौ. रुपाली अजित नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. मठ कुडाळतिठा ते टाकयेवाडी पर्यंत सुमारे चार ते पाच किमी एरियातील वेंगुर्लाकडे जाणाऱ्या बाजूची…

Read Full News

वेंगुर्ला येथे सिंधुदुर्गसामाजिक वनीकरण विभागमार्फतसुरंगी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.२०-:सामाजिक वनीकरण वृत्त ठाणे, विभाग सिंधुदुर्ग यांच्यामार्फत कृषी वानिकी अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथेमहाराष्ट्र राज्य पुणेसामाजिक वनीकरण विभाग,प्रधान मुख्य वनसंरक्षकविवेक खांडेकर (भा.व. से.) यांनी वेंगुर्ला तालुक्यातील आसोली, अणसुर, पाल, इत्यादी गावातील सुरंगी उत्पादक शेतकरी यांना मार्गदर्शन केले व शेतकऱ्याशी संवाद साधला. यावेळी सुरंगी झाडाची उत्पत्ती कशी होते, सुरंगी झाडाचे सरासरी आयुष्यमान किती,…

Read Full News

त्रिंबक येथे महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

चार लाखांच्या औषधांचे मोफत वाटप.. ⚡मालवण ता.२०-:जागृत उन्नती मंडळ आणि सिपन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिंबक येथील जनता विद्या मंदिर येथे भव्य महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन मान्यवर डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते करण्यात आले. या महाआरोग्य शिबिरासाठी सतराहून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभली होती. पंचक्रोशीतील अनेक वृद्ध, महिला तसेच बालकांनी शिबिराचा…

Read Full News

You cannot copy content of this page