नववर्ष स्वागताच्या गर्दीत साटेली-भेडशी बाजारपेठेत अपघात; पादचारी महिला जखमी…

⚡दोडामार्ग ता.३१-: नववर्ष स्वागतासाठी गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे वाढलेल्या गर्दीत आज दुपारी साटेली-भेडशी बाजारपेठेत अपघात झाला. कर्नाटक पासिंगच्या केए-०३ एमएक्स-४७८७ क्रमांकाच्या भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या पिकुळे येथील एका पादचारी महिलेला धडक दिली. या अपघातात महिला किरकोळ जखमी झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी तातडीने मदत करत जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. दरम्यान, अरुंद रस्ते व…

Read More

आंतर महाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धेत श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची दमदार कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.३१-:मुंबई येथे पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धेत श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला. संपूर्ण स्पर्धेत संघाने दाखवलेली एकजूट, शिस्त आणि तांत्रिक कौशल्य उपस्थितांची मने जिंकणारी ठरली.या स्पर्धेत महाविद्यालयातील सुजल सुभाष गवस या खेळाडूने आक्रमक व अचूक खेळ करत उत्कृष्ट शूटर पारितोषिक मिळवून वैयक्तिक कामगिरीची मोहोर उमटवली. त्याचबरोबर सुजल…

Read More

रामगडच्या प्रगत विद्यामंदिरच्या चार विज्ञान प्रतिकृतींची राज्यस्तरावर निवड…

⚡मालवण ता.३१-:राज्य विज्ञान संस्था रवीनगर नागपूर, शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व मिलाग्रीज हायस्कूल सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मिलाग्रीज हायस्कूल सावंतवाडी येथे आयोजित ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मालवण तालुक्यातील रामगड येथील प्रगत विद्यामंदिरच्या चार प्रतिकृतींची राज्यस्तरावर निवड झाल्याने या प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे. एकाच शाळेच्या चार प्रतिकृती राज्यस्तरावर निवड होणारी प्रगत विद्यामंदिर…

Read More

सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी अमोल चव्हाण यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.३१-:सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या वतीने सामाजिक कार्यात सक्रिय असलेले अमोल चव्हाण यांची सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत नियुक्तीपत्र समितीच्या राज्याध्यक्ष डॉ. सौ. सुनीताबाई मोडक यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे. सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या माध्यमातून समाजातील दुर्बल, वंचित, पीडित व गरजू घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून, समाजहिताच्या कार्यासाठी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन ७ जानेवारी रोजी…

⚡मालवण ता.३१-:सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन जिल्हा ग्रंथालय संघांचे अध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सिंधुदुर्ग वाचन मंदिर, तारकर्ली आणि अखिल तारकर्ली ग्राम विकास मंडळ, मुंबई तारकर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लू हेवन रिसॉर्ट, तारकर्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात प्रथम सत्रात सकाळी ९.३० ते १० वा. श्री…

Read More

वेंगुर्ला पोलीस ठाणे च्या वतीने आज मध्यरात्री ऑलआउट ऑपरेशन मोहीम…

⚡वेंगुर्ला ता.३१-: 31st व न्यू इयर 2026 च्या अनुषंगाने वेंगुर्ला पोलीस प्रशासन सलग दुसऱ्या दिवशी अलर्ट मोडवर असून आज बुधवारी रात्री 8 वाजता ते मध्यरात्री 3 वाजता या वेळेत संपूर्ण तालुक्यातऑलआउट ऑपरेशन मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार वेंगुर्ला पोलीस ठाणे च्या वतीने इयर एंडिंग व न्यू…

Read More

फार्मसी विद्यार्थ्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात…

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील फार्मसी कॉलेज सहभागी.. ⚡कुडाळ ता.३१-: असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर्स ऑफ इंडिया (APTI) महाराष्ट्र राज्य शाखा आणि श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी,डिगस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘त्विशा 2.0’ (TVISHA 2.0) क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कोंकण चॅप्टरचे उद्घाटन आप्ती MS महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ.राकेश सोमाणी यांच्या हस्ते ओरोस क्रिडा संकुलात अत्यंत उत्साही वातावरणात पार…

Read More

आपला पैसा आपला अधिकार बाबत जागरूक राहा…

नरेंद्र देवरे :कुडाळात ‘आपला पैसा आपला अधिकार’ मोहिमेचा शुभारंभ.. कुडाळ : आपला पैसा आपला अधिकार याबाबत प्रत्येक ग्राहकांनी जागृत राहिले पाहिजे गेल्या दहा  वर्षात ज्यांनी बँक खाती ऑपरेट केली नाही अशांची करोड मध्ये रक्कम रिझर्व बँकेकडे जमा झालेली आहे. ग्राहक सतर्क राहिला पाहिजे, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडिया रत्नागिरीचे झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे यांनी कुडाळ…

Read More

माजगावच्या विकास कामांमध्ये बाहेरच्यांनी लुडबुड करू नये…

सरपंच व सदस्यांचा इशारा: ग्रामस्थांशी आम्ही चर्चा करूनच हा प्रकल्प योग्य रीतीने मार्गी लावू.. ⚡सावंतवाडी ता.३१-:माजगाव येथे शासनस्तरावर मंजूर असलेला घनकचरा व्यवस्थापन (कचरा डेपो) प्रकल्प माजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत प्रस्तावित असून, सुरुवातीला हा प्रकल्प हेळेकर कुंभारवाडा स्मशानभूमी परिसरात राबवण्याचा प्रस्ताव होता. मात्र या जागेबाबत ग्रामस्थांमध्ये असलेल्या विविध शंका व सूचनांचा विचार करता ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांशी सविस्तर…

Read More

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील निबंध स्पर्धेत आर. पी. बागवे हायस्कूलच्या कु. चैतन्य भोगले याला तृतीय क्रमांक…

⚡मालवण ता.३१-:शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत मसुरे आर. पी. बागवे हायस्कूलचा विद्यार्थी कु. चैतन्य भगवान भोगले याने उल्लेखनीय यश संपादन करत तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याचा जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीम. कविता शिंपी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विज्ञान विषयावरील सखोल मांडणी, विचारांची स्पष्टता तसेच…

Read More
You cannot copy content of this page