कुडाळात ठाकरेसेनेचे अनोखे ‘पेपर विक्री केंद्र’ आंदोलन…
मंदार शिरसाट यांचा पुढाकार:सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीवर उपरोधिक प्रहार.. कुडाळ ता.०१-: पेपरफुटी विरोधात कुडाळ येथे आज सकाळी कुडाळच्या आठवडा बाजारादिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवासेनेने युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने उपरोधात्मक ‘पेपर विक्री केंद्र’ आंदोलन छेडले. राज्यात आणि देशात सातत्याने होणाऱ्या पेपर फुटीमुळे प्रामाणिकपणे रात्र-दिवस अभ्यास करणाऱ्या लाखो गरीब व गरजू…
