Headlines

मुसळधार पावसामुळे जलजन्य आजारांचा धोका; पाणी उकळूनच पिण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

ओरोस, ता. ६ :सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता वाढली असून अतिसार, कॉलरा, टायफॉईड, कावीळ आणि गॅस्ट्रोएन्टरायटिससारख्या जलजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता जपण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी आणि शक्यतो पाणी उकळून किंवा निर्जंतुक करूनच वापरावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.आरोग्य विभागाने…

Read More

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त भाजपाचे कार्यकर्ता संमेलन; ओरोसमध्ये ५० हून अधिक जणांचे रक्तदान…

⚡ओरोस, ता. ६-: भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंती स्मरण पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग आणि भाजपा ओरोस मंडळाच्या संयुक्त विद्यमाने भाजपा जिल्हा कार्यालय, ओरोस येथे कार्यकर्ता संमेलन व रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात ५० हून अधिक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ….

Read More

वालावलच्या धोकादायक शाळा इमारतीची जि.प. अध्यक्षांकडून पाहणी; विद्यार्थ्यांना अंगणवाडीत हलविण्याचे निर्देश…

⚡ओरोस, ता.०६-: वालावल येथील हुमरमळा-करमळीवाडी प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक असल्याची माहिती मिळताच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईल यांनी तातडीने शाळेला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात लगतच्या अंगणवाडी इमारतीत स्थलांतरित करून शैक्षणिक कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.पाहणीदरम्यान गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख…

Read More

ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अधिवेशन वडगाव मावळ येथे आयोजन

जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी बहुसंख्यने सहभागी होण्याचे आवाहन कुडाळ : भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते व ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे २०२६ चे राज्य अधिवेशन शनिवार दिनांक ८ आणि रविवार दिनांक ९ ऑगस्ट,२०२६ रोजी शिवराज पॅलेस, मुंबई पुणे हायवे, वडगाव मावळ पुणे येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय…

Read More

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदग्रहण सोहळ्यात डॉ. संतोष राणे यांनी स्वीकारला पदभार…

सिंधुदुर्गातून सात जणांना गव्हर्निंग कौन्सिल मेंबरचा पदभार.. ⚡कुडाळ ता.०६-: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर ही संस्था शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. या शतक महोत्सवी वर्षानिमित्त नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कुलाबा, मुंबई येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते…

Read More

वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश…

चिमणी पाखरे आणि नेक्सस सुरेश बिर्जे ऑलिम्पियाड स्कूलचा संयुक्त वनमहोत्सव.. ⚡कुडाळ ता.०६-: पर्यावरणाचे संवर्धन आणि वृक्षारोपणाचे महत्त्व बालवयापासून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याच्या उद्देशाने चिमणी पाखरे प्री-स्कूल व नेक्सस सुरेश बिर्जे ऑलिम्पियाड स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जिव्हाळा सेवाश्रम येथे वनमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.या उपक्रमात दोन्ही शाळांतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्या हातांनी सेवाश्रम परिसरात विविध प्रकारच्या रोपांचे…

Read More

मळगाव रेल्वे फाटक येथील गतिरोधकांची उंची कमी करा…

*हेमंत मराठे यांची सा बां विभागकडे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी मळगाव रेल्वे फाटक निरवडे मार्गावर असलेल्या गतिरोधकांची उंची प्रमाणापेक्षा जास्त असल्याने ती तात्काळ कमी करावी अशी मागणी मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागकडे केली आहे.सावंतवाडी मळगाव रेल्वे फाटक निरवडे मार्गावर सार्वजनिक बांधकामांकडून मोठ्या प्रमाणात गतिरोधक घालण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी या मार्गावरून…

Read More

ग्रामस्थांच्या तत्परतेने हटविले रस्त्यातील झाड; बांदा-डेगवे मार्गावरील वाहतूक सुरळीत…

⚡बांदा ता.०६-: बांदा-डेगवे मुख्य रस्त्यावरील डेगवे-भयकान येथे आज दुपारी अतिवृष्टीने झाड अचानक रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. साहिल देसाई, नारायण देसाई, श्रावण देसाई, सिद्धांत देसाई, मधुकर देसाई आणि सलिल देसाई यांनी एकत्रितपणे झाड तोडून रस्त्याच्या बाजूला…

Read More

देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्या अध्यक्षपदी अनुश्री पारकर; सचिवपदी दयानंद पाटील

देवगड (प्रतिनिधी) देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नवीन संचालक मंडळाची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदी रोटेरियन अनुश्री पारकर, सचिवपदी रोटेरियन दयानंद पाटील तर खजिनदारपदी रोटेरियन अनिल गांधी यांची निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी रोटेरियन विजय बांदिवडेकर, सार्जंट ॲट आर्म्स रोटेरियन मनस्वी घारे, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी रोटेरियन गौरव पारकर,…

Read More

*पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज थोर लोक कल्याणकारी राजा…

भरत गावडे:तळवडे येथे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची पुण्यतिथी साजरी.. ⚡सावंतवाडी ता.०६-: आदर्शवत जीवन जगण्यासाठी आपल्यासमोर उत्तुंग व्यक्तिमत्वांचे आदर्श असायला हवेत. थोरा मोठ्यांची जीवनचरित्रांच्या अभ्यासातूनच आपल्याला असे आदर्श सापडतात. सावंतवाडी संस्थानांचे राजे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज हेही एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले थोर लोक कल्याणकारी राजे होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य तथा दाणोली…

Read More
You cannot copy content of this page