कणकवलीत पहाटे चोरट्याचा धुमाकूळ; सहा दुकाने फोडली…
⚡कणकवली ता.०४-: शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने तब्बल सहा दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली. आचरा रोडसारख्या नेहमी गजबजलेल्या मार्गावर ही चोरी घडल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आचरा रोडवरील सना कॉम्प्लेक्समधील तीन दुकाने तसेच काही अंतरावर असलेल्या बेंगलोर अय्यंगार बेकरीच्या बाजूच्या राज मेडिकलसह आणखी तीन दुकानांची शटर उचकटून…
