बांदा विठ्ठल मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे रविवारी महा रक्तदान शिबिर; शेतकऱ्यांना मोफत काजू व सुपारी कलमांचे वाटप
⚡बांदा ता.१७-: येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर (बांद्याचा बाप्पा) यांच्या वतीने यंदाच्या ७ व्या वर्षानिमित्त रविवार दिनांक १९ जुलै रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान, यानेच वाचतील…
