जिल्हा रुग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम…

⚡ओरोस ता.०२-: जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त नशाबंदी मंडळ व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. श्याम पाटील, डॉ. चिपळणूकर, डॉ. चुंबे, डॉ. समीर धाकोरकर, डॉ. सुबोध इंगळे, नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तंबाखू नियंत्रण कक्षाच्या वतीने रांगोळी, निबंध,…

Read More

कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने घेतली एसटीच्या अधिकार्‍यांची भेट…

⚡कणकवली ता.०२-: कणकवली आगारातील एसटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत कामगार सेनेचे कोकण विभागीय सचिव भगवान उर्फ आबा धुरी व तालुकाप्रमुख वैभव मालंडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कणकवली आगाराचे व्यवस्थापक अजय गायकवाड व बसस्थानक प्रमुख प्रदीप परब यांची भेट घेतली. भेटीदरम्यान कामगारांच्या प्रश्‍नांबाबत चर्चा केली. ड्युट्या लावताना कर्मचार्‍यांमध्ये भेदभाव केला जात असल्याची बाब एसटीच्या अधिकार्‍यांना निदर्शनास आणून दिली….

Read More

युवासेना करणार ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान…

सुशांत नाईक यांची माहिती ः आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम.. ⚡कणकवली ता.०२-: युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली विधानसभा युवासेनेतर्फे ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान पंधरावडा साजरा केला जाणार आहे. ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करत त्यांनी दिलेल्या आतापर्यंतच्या योगदानाबद्दल गौरव केला जाणार आहे. शिवसेनावाढी सोबतच समाजातही ज्येष्ठ नागरिकांनी व…

Read More

जून महिना उजाडला तरी मालवण शहरात गटार खुदाईचे काम धीम्यागतीने सुरु…

⚡मालवण ता.०१-: पावसाळ्या पूर्वी गटार खुदाई व ओढे, नाले, सफाई पूर्ण होणे गरजेचे असताना मालवण शहरात मात्र पाऊस तोंडावर आला तरी गटार खुदाईचे काम संथ गतीने सुरु असून अद्यापही शहरातील अनेक भागातील गटारे व नाले यांची साफसफाई करणे बाकी आहे. वस्तुतः हवामान विभागाने जिल्ह्यात दि. २ ते ४ जून या कालावधीसाठी यलो अलर्ट जाहीर करीत…

Read More

मालवण समाज मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण*….

⚡मालवण ता.०१-: बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून मालवण बौद्धवाडी येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण प्रवीण खोब्रागडे व त्यांच्या सुविधा पत्नी खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले दी बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुकाच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मालवण बौद्धवाडी समाज मंदिर येथे साजरी करण्यात आली….

Read More

लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर कोणीही वादग्रस्त पोस्ट करू नये…

मालवण पोलीस ठाण्याचे नागरिकांना आवाहन.. ⚡मालवण ता.०१-: लोकसभा निवडणुकीचा निकाल दि. ४ जून रोजी जाहीर होणार असून निकालानंतर सोशल मीडियावर कोणीही वादग्रस्त किंवा कोणाच्या भावना दुखावणाऱ्या टिप्पणी अथवा पोस्ट करू नयेत, घोषणाबाजी किंवा विजयी मिरवणूक काढू नये. सोशल मीडियावरील एखाद्या पोस्ट मुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यसह संबंधित सोशल मीडिया ग्रुपच्या…

Read More

शिवसेना युवासेनेतर्फे मालवणमधील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

⚡मालवण ता.०१-: शिवसेना युवासेना मालवण तालुका व युवासेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने तसेच शिवसेना नेते किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण मधील दहावी परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांचा व पालकांचा गौरव केला. यामध्ये मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या कैवल्य सागर मिसाळ – कुंभारमाठ (९९.४० टक्के,…

Read More

मी एक्झिट पोलकडे पाहत नाही…

नारायण राणे:माझा विजय निश्चित.. ⚡कुडाळ ता.०१-: मी मागील पाच – पन्नास वर्षे राजकारणात घालवली. आमचे पण काही अंदाज आहेत. आम्ही पण निवडणूक लढवली आहे. आम्ही निवडणूकीत नामधारी नाही तर सक्रिय होतो, त्यामुळे एक्झिट पोल कडे मी पाहत नाही, माझा विजय निश्चित आहे अशी स्पष्ट प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली.कुडाळ येथील गुलमोहर हाॅल येथे…

Read More

संजू परब यांनी माझ्यावर केलेला आरोप म्हणजे एक प्रकारे “बालिशपणा”…

राजन तेली: आमदारकीसाठी इच्छुक असतील तर पक्षाकडे उमेदवारी मागावी… ⚡सावंतवाडी ता.०१-: स्वतःच्या गावात पाच दिवस लाईट नसताना ती सुरळीत न करू शकणारे संजू परब यांनी माझ्यावर आरोप करू नये. मी माझ्या स्वतःच्या कामासाठी न जाता मी जनतेच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी गेलो होतो. त्यामुळे माझ्यावर केलेला आरोप म्हणजे संजू परब यांचा हा बालिशपणा आहे असा पलटवर…

Read More

निरंजन डावखरे निवडून आल्यापासून कधीही पदवीधरांकडे पोहोचलेच नाहीत…

अभिजीत पानसे:मला फक्त तुम्ही साथ द्या मी सिंधुदुर्गात येऊन राहीन.. सावंतवाडी ता.०१-: पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांना कोणी पाहिलाय का ते निवडून आल्यापासून कधीही कोकणात पदवीधरांकडे पोहोचलेच नाहीत. मनसेनेने कोकणच्या पदवीधरांसाठी व्हिजन तयार केला आहे मला फक्त तुम्ही साथ द्या मी या सिंधुदुर्गात येऊन तुमच्यात राहीन असे मनसेनेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी…

Read More
You cannot copy content of this page