गणेश भजनातून जमलेल्या निधीतून गरजू व्यक्तींना केली मदत…!
मालवण (प्रतिनिधी) तारकर्ली गावातील बाळगोपाळांनी गणेशोत्सवात घरोघरी गणेश भजन सादर करून त्याद्वारे जमलेला निधी तारकर्ली मधील अविनाश चंद्रकांत धुरत आणि बबन लोणे या आजाराने त्रस्त असलेल्या गरजू व्यक्तींना मदत म्हणून सुपूर्द केला. सलग सहाव्या वर्षी या बाळगोपाळानी हा उपक्रम राबवित समाजासमोर आदर्श निर्माण केला असून याबद्दल या बाळगोपाळांचे तारकर्ली पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. तारकर्ली गावातील…
