बांद्यात नट वाचनालयच्या वतीने बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन…!

⚡बांदा ता.१९-: येथील नट वाचनालयच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विष्णु नारायण गांवकर, आडाळी पुरस्कृत (त्यांची पत्नी “कै. सौ. विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व सुपुत्र कै. बिपीन विष्णु गांवकर स्मरणार्थ”) बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालयच्या नाडकर्णी सभागृहात होणार आहे.

ही स्पर्धा मावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित असून इयत्ता तिसरी ते चौथी आणि इयत्ता पाचवी ते सातवी अशा दोन शालेय गटात होणार आहे.
लहान गटासाठी विषय वेळ ४ मिनिटे ‘मला आवडलेली कथा किंवा गोष्ट’, तर मोठ्या गटासाठी गटासाठी विषय (वेळ ५ मिनीटे) ‘साहसी कथा’ असा विषय ठेवण्यात आले आहेत.
दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या ग्पर्धेसाठी एका गटात एका शाळेतील फक्त दोनच विद्यार्थी स्विकारले जातील. तरी या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे ३ ऑक्टोबर पर्यंत नट वाचनालयात आणून द्यावीत, व ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन नट वाचनालयाच्यावतीन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी संपर्कासाठी या ( ९४०५५७०३४९) क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page