⚡मालवण ता.१७-: मालवण तालुक्यातील पोलीस पाटील भरतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर नियुक्ती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिका-यांना निवेदन दिल्यानंतर आता कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील भरतीमधील ५१ पात्र उमेदवारांनी प्रांताधिकारी कार्यालय कुडाळ येथे जावून लवकरात लवकर नियुक्ती मिळावी यासाठी निवेदन दिले. प्रांताधिकारी कार्यालय येथे नायब तहसीलदार प्रदिप पवार यांनी हे निवेदन स्विकारले.
यावेळी सुनिल खरात, रविंद्र कदम, समीर तोरसकर, वैभव ढवळे, तुषार जाधव, ह र्षिता ठाकूर, सदफ खुल्ली, शितल झोरे, छाया भोसले, श्वेता मेस्त्री, समीर वालावलकर, प्रकाश डोईफोडे, सुवर्णा म्हाडदळकर, स्वप्नील परब, राजन राणे, अरविंद बिले, हेमंत वारंग, नि खिल गोसावी, विशाल चव्हाण, अक्षता सावंत, अर्जुन देसाई, अजित जाधव, अक्षय नेरुरकर तसेच मालवण तालुक्यातील भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारही उपस्थित होते.
मालवण आणि कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील भरती २०२३ हा कार्यक्रम शासनाने निश्चित केलेल्या तारखाप्रमाणे योग्य प्रकारे पार पाडला आहे. त्यानुसार दोन्ही तालुक्यातील अंतिम निवड झालेल्या उमेदवारांसह प्रतिक्षा यादी १५ मार्च २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानंतर ८ जुलै ते १८ जुलै २०२४ या कालावधीत अंतिम कागदपत्र पडताळणी देखील पार पडली आहे. या भरती प्रक्रियमधील आम्ही सर्व उमेदवार सदरची निवड यादी प्रसिध्द झाल्यापासून नियुक्ती पत्राच्या प्रतिक्षेत आहोत. परंतु गेल्या तीन महिन्यापासून अद्याप पर्यंत आम्हाला नियुक्ती पत्र देण्यास विलंब होत आहे. आम्ही आमच्या हातातील असलेला कामधंदा सोडून भरती प्रक्रियेमधील आशेवर आहोत. गेल्या तीन महिन्यापूर्वी नियुक्ती पत्र देणे शक्य असताना तसे न केल्याने आमचे आ र्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
