⚡सावंतवाडी ता.१६-: मंत्री दीपक केसरकर आंबोलीत गेले असता देवस्थानचे प्रमुख मानकरी विलास गावडे यांची प्रकृती बिघडली. श्री. गावडे यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी सावंतवाडीत हलविण्यात आले.
यावेळी तात्काळ मंत्री केसरकर यांनी त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी मदत केली. ही मदत प्रमुख मानकरी गावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी शशिकांत गावडे, रामा गावडे, रामा रूपा गावडे आदी देवस्थानचे मानकरी उपस्थित होते. मंत्री केसरकर यांनी केलेल्या मदतीसाठी आभार मानले आहेत.
