मंत्री केसरकर यांचा मंत्रिपदाचा फायदा स्वार्थासाठी…

रुपेश राऊळ: कारीवडे आंबेगाव येथे शेतकऱ्यांना केले खत वाटप..

⚡सावंतवाडी ता.१६-: मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रीपदाचा वापर स्वतःसाठी केला आहे त्यांनी गेल्या अडीच वर्षात सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे आहे.निवड पाठ फिरवली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनतेने केसरकार यांन धडा शिकवावा असे आवाहन सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केले. श्री राऊळ कारिवडे येथे भगवा सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी ते पुढे म्हणाले आता महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसू लागला आहे. त्यामुळे ते भीतीपोटी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची नामुष्की वेळ आली परंतु याला जनता कुठल्याही गोष्टीला बळी न पडता येणाऱ्या निवडणुकीत ते महाविकास आघाडीलाच साथ देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी त्यांनी कारिवडे आंबेगाव येथील शेतकऱ्यांना खत वाटप केले.

You cannot copy content of this page