सावंतवाडी तालुक्यात १६ पासून भगवा सप्ताह..

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व श्री रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून सप्ताह सुरु:कोलगाव जिल्हा जिल्हा परिषदपासून सुरुवात..

⚡सावंतवाडी ता.१४-: शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताहनिमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभाप्रमुख श्री रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून 16 ऑगस्टपासून सावंतवाडी तालुक्यामध्ये कोलगाव जिल्हा परिषदपासून सुरुवात होत आहे. याबाबतची माहिती तालुका संघटक मायकल डिसोजा यांनी दिली.दरम्यान

कोलगाव येथे सकाळी उदघाटन शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख श्री अरुण दूधवडकर व जिल्हाप्रमुख श्री बाबुराव धुरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. तरी तालुक्यातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका संघटक मायकल डिसोजा यांनी केले आहे.

You cannot copy content of this page