मंत्री दीपक केसरकर:ग्रामस्थांच्या मागणीला यश..
⚡सावंतवाडी ता.१४-: चौकूळ जमीन प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ग्रामस्थांच्या मागणीला यश आले आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे सातबारा वरील महाराष्ट्र शासन नोंद रद्द करून पूर्वीप्रमाणेच कबुलायतदार गावकर असा सातबारा होणार आहे. मात्र वैयक्तिक सातबारा राहता एकाच सातबारावर सर्व ग्रामस्थांची नावे येणार असून इतर हक्कांमध्ये कबुलायतदर गांवकर अशी नोंद असणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दुरस्थ प्रणाली द्वारे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
.
