रोटरी क्लबच्या समरगीत समूहगायन स्पर्धेत मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा व ओझर विद्यामंदिर प्रथम…

मालवण (प्रतिनिधी)

स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब मालवणतर्फे घेण्यात आलेल्या ‘शालेय समरगीत समूहगायन २०२४’ स्पर्धेस मालवण तालुक्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत प्राथमिक गटात मालवण येथील मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेने तर माध्यमिक गटात कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिरने प्रथम क्रमांक पटकावला.

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे ही स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा लिमये हॉस्पिटलचे डॉ. अजित लिमये व डॉ. लीना लिमये यांनी पुरस्कृत केली होती. या स्पर्धेत प्राथमिक गटात ६ शाळा तर माध्यमिक गटात ११ शाळा अशा एकूण १७ शाळांच्या संघांतून १९२ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी सर्व सहभागी शाळांच्या मुलांनी विविध समरगीते उत्तमरित्या सादर केली. स्पर्धेचे परीक्षण संजय आठले, शाम तेंडोलकर (कुडाळ) यांनी केले. सूत्रसंचालन प्रदीप सामंत, सुविधा तिनईकर, श्वेता पेडणेकर, महादेव पाटकर यांनी केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – प्राथमिक गट- द्वितीय- जिल्हा परिषद शाळा कांदळगाव, तृतीय- भंडारी प्राथमिक शाळा, उत्तेजनार्थ- कन्या प्राथमिक शाळा. माध्यमिक गट- द्वितीय- टोपीवाला हायस्कूल मालवण, तृतीय- रेकोबा माध्यमिक विद्यालय, उत्तेजनार्थ- कन्या माध्यमिक शाळा. सर्वोत्कृष्ट वादक- सुधीर गोसावी- टोपीवाला प्राथमिक शाळा.

सर्व विजेत्या संघाना मान्यवरांच्या हस्ते रोख रुपयांची पारितोषिके व डॉ. लिमये चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच या वर्षीपासून दोन्ही गटातील प्रथम आलेल्या मुलांना मेडल्स आणि वादकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच रोटरी क्लब तर्फे सहभागी सर्व मुलांना प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी रोटरी क्लब अध्यक्ष रमाकांत वाक्कर, डॉ. लीना लिमये, डॉ. अजित लिमये, प्रदीप जोशी, नीलम जोशी, सुविधा तिनईकर, महादेव पाटकर, गौरी पाटकर, प्रसन्नकुमार मयेकर, नीलम मयेकर, श्वेता पेडणेकर, प्रदीप सामंत, अभय कदम, तनिष्का कासवकर, अवि नेरकर, अमरजित वनकुद्रे, उमेश सांगोडकर, भाऊ साळगांवकर, बाळु तारी, रंजन तांबे, संदेश पवार, सौ. पवार, हेमेंद्र गोवेकर, सुहास ओरसकर, महेश काळसेकर, यशश्री वरक, दिप्ती घागरे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page