तीन इसमांवर गुन्हा दाखल..
बांदा/प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावर बांदा डोंगरआळी येथे तीन बुरखाधारी इसमानी आपल्या कार्यालयात घुसून धक्काबुक्की करत कार्यालयातील दस्तऐवज व आपला मोबाईल हिसकावून नेल्याची तक्रार सचिन बाळकृष्ण गवस (मुळ रा. झोळंबे, सध्या रा. बांदा) यांनी बांदा पोलिसात दिली आहे. तक्रारीनुसार बांदा पोलिसात तीन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या उद्देशानेच ही घटना घडली असल्याचा आरोप श्री गवस यांनी केला आहे.
झटापटीत श्री गवस यांच्या हाताला व डोक्याला दुखापत झाली आहे.
