कणकवलीतील वेशभूषा स्पर्धेला उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद…

नगरपंचायतीचे आयोजन ; मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्‍कार…

कणकवली : स्वातंत्रदिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनाच्या औचित्‍यावर कणकवली नगरपंचायतीच्यावतीने आज वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यात शहरातील तब्‍बल २५० जणांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्‍यांचा उद्या (ता.१५) सत्‍कार होणार आहे. तर आजच्या कार्यक्रमात मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याहस्ते माजी सैनिकांचा सत्‍कार करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्‍यावर कणकवली नगरपंचायतीच्यावतीने विविध कार्यक्रम राबवले जात आहेत.

यात आज कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात वेषभूषा स्पर्धा, समूहगीत गायन आणि माजी सैनिकांचा सत्‍कार झाला. यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, कणकवली कॉलेजचे प्राचार्य युवराज महालिंगे, विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक पिराजी कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सुरवातीला माजी सैनिक संतोष वसंत मुसळे, बाळकृष्ण महादेव सावंत, अशोक रामचंद्र राणे, सिताराम गोपाळ कुडतरकर, हरिश्चंद्र सिताराम बाईत आणि आनंद पेडणेकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्‍कार करण्यात आला. वेषभूषा स्पर्धेत कणकवली शहरातील शाळा क्रं. २, ३ आणि ५ चे विद्यार्थी तसेच विद्यामंदिर आणि एस.एम.हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सेनानी, थोर पुरूष आदींच्या वेषभूषा सादर केल्या. तर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र गीत, समूहगान, वैयक्तिक व सामूहिक नृत्यकला सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका सोनसूरकर आणि अमोल भोगले यांनी केले. तर आभार ध्वजा उचले यांनी मानले. तर कार्यक्रम यशस्वितेसाठी किशोर धुमाळे, सतीश कांबळे, विभव करंदीकर, सचिन नेरकर, रूचिता ताम्हणकर, निकीता पाटकर, ज्योती देऊलकर, अस्मिता चव्हाण, सुमित कुबल, प्रशांत राणे, संदीप मुसळे यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page