मात्र तिकीट मिळेल तो निवडणूक येणारा नशीबवान असेल:संजू परब यांचे वेंगुर्ले परुळे येथे प्रतिपादन
⚡वेंगुर्ला ता.११-: तिकीट कोणाच्या नशिबात आहे, हे कोणालाच माहित नाही. मात्र ज्याला तिकीट मिळेल तो निवडून येणारा नशीबवान असेल, परंतु स्पर्धेत भाग घेणे हे महत्त्वाच आहे. स्पर्धेत भाग घेतला तरच नंबर येतो, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केले. दरम्यान शिवशाही मंडळांनी 21 वर्ष पूर्ण केले ही बाब कौतुकास्पद आहे. मंडळ टिकून ठेवणे ही साधी गोष्ट नाही. मात्र त्यांनी अशीच शंभरावे वर्ष गाठावे, असे गौरउद्गार देखील श्री परब यांनी यावेळी काढले. वेंगुर्ला परुळे आयोजित नारळ लढवणे स्पर्धेनिमित्त श्री परब व्यासपीठावर उपस्थित राहून बोलत होते.
