गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याने घेतला पुढाकार
*💫सावंतवाडी दि.०७-:* दाणोली येथे कोरोनाचे रूग्ण सापडताच संजू विरनोडकर व टिमने दाणोली बाजारपेठ, वाडी, मृतबाधितताच्या संपुर्ण घरात, बाबुराव पाटयेकर हायस्कूल दाणोली या भागात कोरोना बाधित सापडल्यामुळे या संपुर्ण स्कुलमध्ये कोव्हिड प्रतिबंधकफवारणी केली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत गावचे सरपंच, संदिप सुखी, महेश सुखी व गावातील युवकांनी महिलानी देखील सहभाग घेतला होता. ग्रामस्थानी व हायस्कूल मधील कर्मचारीवर्गाने या टिमचे आभार मानले आहेत. या फवारणी वेळी आकाश मराठे, संतोष तलवणेकर, तुषार बांदेकर यानी सहभाग घेतला होता.
