जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांच्याहस्ते नियुक्तीपत्र;पोलिस अधीक्षक दाभाडे यानी दाखविली अडिज महिन्यात तत्परता
कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक कै आत्माराम विजय गांवकर यांचे १ जानेवारी २०२१ रोजी आकस्मिक निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती अर्पिता यानी १६ फेब्रूवारी २०२१ रोजी अनुकंपाखाली नोकरी मिळण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे अर्ज केला होता. परिपूर्ण अर्ज व शारीरिक मोजमापे आणि वैद्यकीय तपासणी पात्र ठरल्याने अधीक्षक दाभाडे यानी त्यांना ५ मार्च २०२१ रोजी अनुकंपाखाली शिपाई पदासाठी नियुक्ती जाहिर केली होती. हे नियुक्ती पत्र जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याहस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.
