आयशर टेंपोच्या अपघातात वेंगुर्ल्यातील दोन तरूण जागीच ठार…

वेंगुर्ला प्रतिनिधी-मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण-कामथे येथे रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून आयशर टेंपोची जोरदार धडक बसली. या अपघातात वेंगुर्ला, किनळणे-भटवाडी येथील ऋत्विक संतोष शिरोडकर (२४) व वेंगुर्ला-परबवाडा येथील रामचंद्र राजेंद्र शेणई या दोन्ही तरूणांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी घडली. अपघात इतका भिषण होता की, आयशर टेम्पोच्या केबिनचा चक्काचूर झाला. दोन्हीही युवकांच्या निधनाची बातमी समजताच वेंगुर्ला गावावर शोककळा पसरली आहे.

You cannot copy content of this page