⚡सावंतवाडी ता.०२-: तालुक्यातील मौजे चराठे येथील शेतकरी श्री यशवंत गणपत बिर्जे गावठाणवाडी यांचे राहते घर आर्थिक दृष्टीमुळे घराची भिंत कोसळून स्वतः श्री यशवंत बिर्जे व त्यांच्या मुलगा गणपत बिर्जे हे दोघे ढिगार्याखाली सापडून जबर जखमी झाले. ग्रामस्थांनी तात्काळ ढिगार्यातून दोन्ही व्यक्तींना काढून जखमी परिस्थितीत उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या श्री यशवंत बिरजे यांना तातडीची मदत म्हणून सावंतवाडी आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना तातडीची आर्थिक मदत केली.
