विधानसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडून अद्याप कोणत्याही नावाचा ठराव नाही…

समीर वंजारी यांचा खुलासा; काँग्रेसचे अंतर्गतवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर..

⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी तालुक्यात काल झालेल्या काँगेसच्या बैठकीत आगामी विधानसभेसाठी कोणाचाही उमेदवारी बाबत ठराव अद्याप घेण्यात आला नसल्याचा खुलासा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी यांनी आज केला आहे.

दरम्यान काँग्रेसकडून अनेक जण विधानसभेसाठी इच्छुक असून, एका उमेदवारासाठी असा कोणताही ठराव झाला नसून, केवळ संघटनात्मक या विषयांवर चर्चा झाली असे ते म्हणाले आहेत. यावरून सावंतवाडी तालुका काँग्रेस मध्ये असलेले अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळत आहेत.

You cannot copy content of this page