प्रवीण भोसले;अननुभवी विशाल परबांना इंडिया आघाडीत स्थान नाही;मात्र भाजपकडून त्यांना सहज उमेदवारी मिळेल..
⚡सावंतवाडी ता.३०-: आमदार गेले पंधरा वर्षे आमदार तसेच मंत्री असून देखील या दीपक केसरकर या मतदारसंघासाठी काही करू शकलेले नाहीत, शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी चांगले निर्णय घेतले असते तर आम्ही त्यांचे स्वागत केले असत, मात्र एका अकार्यक्षम माणसाला एवढे मोठे मंत्रिपद देऊन त्यांनी सावंतवाडीची शान घालवली अशी टीका माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज येथे केली.दरम्यान विशाल परब हे अननुभवी त्यांनी साधी ग्रामपंचायत देखील लढवली नाही त्यामुळे अशा माणसाला इंडिया आघाडी कडून उमेदवारी मिळणे शक्य नाही, परंतु भाजप कडून त्यांना सहज उमेदवारी मिळू शकते परंतु उमेदवारी कोणाला द्यायचं हे भाजपचा निर्णय असं मत आहे त्यांनी यावेळी मांडलं. ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
श्री भोसले पुढे म्हणाले आता विधानसभेच्या तोंडावर गणेश मंडळांना पुन्हा बाजापेठेवाटण्याच अमिष केसरकर दाखवत आहेत. मंडळांना पेटी देण्यास आमचा विरोध नाही मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते करीत असलेले राजकारण योग्य नाही. केवळ मतांवर डोळे ठेवून अशा मंडळांचा वापर करून घेत आहे. गेले दोन वर्षात गणेश उत्सव नव्हता का.? असा सवाल हे श्री भोसले यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल पंचायत समिती इमारत हे दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाले होते मात्र जागेचा मुद्दा उपस्थित करून मुद्दाम त्यात हो घालण्याचे काम केसरकर यांनी केले आहे. दरवाजात असलेल्या एसटी स्टँड ची देखील तीच परिस्थिती आहे त्यामुळे एवढी साधी कामे देखील करू न शकलेल्या केसरकारांना जनता आता थारा देणार नाही असा टोलाही श्री भोसले यांनी यावेळी हाणाला. दरम्यान केसरकर गाजावाजा करीत असलेले ताज हॉटेल व सिद्धादी हॉटेल हे दोन प्रकल्प शरद पवार यांनीच आणले होते मात्र केव्हा श्रेयवादासाठी पूर्ण होऊ शकले नाहीत आता सावंतवाडीत आपण पंचतारांकित हॉटेल आणत आहे असा गाजावाजा करून केसरकर इलेक्शनच्या तोंडावर जनतेची पुन्हा एकदा दिशाभूल करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान मीही अनुभवी असून सावंतवाडी मतदार संघात मी सर्वात ज्येष्ठ आहे मी देखील निवडणूक लढवली असती मात्र सध्या सुरू असलेल्या कसरती मला मिळण्यासारखे नाहीत. असे सांगत प्रवीण भोसले यांनी निवडणूक लढवण्याबाबतची भूमिका आपली स्पष्ट केली.
