५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान : लायन्स क्लब ऑफ मालवण, ग्लोबल रक्तसमूह व मुत्थूट फिनकॉर्प शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन_
*💫मालवण दि.०५-:* मालवण शहरातील केबल व्यावसायिक तसेच अनेक सामाजिक व रक्तदान या उपक्रमात नेहमी अग्रेसर असणारे श्री. मुकेश बावकर यांचा ५५ वा वाढदिवस सोहळा येथील दैवज्ञ भवन येथे साजरा झाला. यावेळी बावकर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या वैयक्तिक ५० व्या रक्तदानाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ मालवण, येथील ग्लोबल रक्तसमूह व मुत्थूट फिनकॉर्प शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. उद्घाटन मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सावली ग्रुप, शासकीय तंत्रनिकेतन मालवण, इंडियन रेडक्रॉस सोसायटी सिंधुदुर्ग उपशाखा मालवण, लायन्स क्लब ऑफ मालवण, रोटरी क्लब ऑफ मालवण, सुनीतीदेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर, १०० इडिएट ग्रुप, दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळ, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, एकता मित्रमंडळ या संस्थांचा तसेच आदर्श रक्तदाते म्हणून सुनील परुळेकर, आतू फर्नाडिस, संदीप पेडणेकर, केतन कोचरेकर मंदार लुडबे, अमेय देसाई, अमित वेंगुर्लेकर, अंकुश कातवणकर, दीपक ढोलम, महेंद्र पारकर, नंदू फणसेकर यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आदर्श कुटुंबाचा बहुमान शिरपुटे कुटुंबाला देण्यात आला. यावेळी नगरसेवक मंदार केणी यांनीही रक्तदान केले. जॉन नहोना, परशुराज पाटकर, महेश काळसेकर, चाचा हडकर, गणेश कुशे, सुहास सांगोडकर, पत्रकार ऋषी देसाई, किरण वाळके, प्राचार्य मंडले सर उपस्थित होते. शिबिरासाठी ग्लोबल रक्तसमूहाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. मुत्थूट फिनकॉर्पच्या शाखाधिकारी स्नेहा जामसंडेकर व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन गणेश प्रभूलकर यांनी केले.
