पळसंबची सुकन्या श्रृती परब राज्यस्तरीय स्पर्धेत चमक…

किकबॉक्सिंग चॅम्पियन्सशिप स्पर्धेत मिळविले सुवर्ण पदक..

⚡मालवण ता.२९-: मालवण तालुक्यातील पळसंब गावठाण येथील मुंबईस्थित रहिवाशी कु. श्रुती संदिप परब हिने १४ जुलै रोजी झालेल्या राज्य स्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आणि पळसंब गावचे नाव उज्वल केले. तिची महाराष्ट्र संघातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे

म्हापसा, गोवा येथे २४ जुलै ते २८ जुलै २०२४पर्यंत आयोजित ‘वाको इंडिया सीनियर्स अँड मास्टर्स नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियन्सशिप’ स्पर्धेत आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, केरळ, दिल्ली, आणि इतर राज्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. १८ वर्षे वरिल वरिष्ठ मुलींच्या वयोगटातील लढतीत प्रथम च अनुभव घेतला. या कठीण आणि सर्वोत्कृष्ट समजणार्‍या खेळाच्या स्पर्धेत सिंधुदुर्गाची मान अभिमानाने उंचावणार्‍या पळसंब गावची कन्या, व महाराष्ट्र मुंबई येथील कु. श्रुती संदिप परब हिने कांस्यपदक पटकावले. तीचे श्री.जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडच्यावतीने अध्यक्ष श्री. उल्हास सावंत यांनी त्यांचे खुप खुप अभिनंदन केले आहे. तसेच पळसंब माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, जेष्ठ अभिनेते गिरीधर पुजारे यांनी तिचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस श्रुती परब हीला शुभेच्छा दिल्या. श्रुती परबने या यशाचे श्रेय ओमकार मार्शल आर्ट्स अकादमीचे प्रशिक्षक ओमकार शिवणकर आणि त्यांच्या टिमला दिले आहे.

You cannot copy content of this page