⚡मालवण ता.२८-:
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण या शाखेशी संलग्न प्रगत विद्या मंदिर, रामगड या शाळेत साने गुरुजी कथामालेची स्थापना कथामालेचे मालवण तालुका अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना ‘कथा : तंत्र आणि मंत्र’ या विषयावर सुरेश ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. तसेच कथा निवेदकासाठी आवश्यक असणारे गुण याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. साने गुरुजी कथामाला का सुरू करण्यात आली ? कथामालेचे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना होणारे फायदे, कथामाधा उपक्रमांची स्वरूप याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. गाणी, गप्पा, गोष्टी अशा स्वरूपात हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कथामालेचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी विविध उपक्रम नियमित चालू ठेवू, असा विश्वास मुख्याध्यापक श्री. वळंजु यांनी व्यक्त केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी आम्ही चालवू हा पुढे वारसा, खरा तो एकची धर्म ही प्रार्थना सादर केली. यामध्ये निकीता हाटले, चैताली सांडवे, चिन्मयी शिंदे, सानिका घाडीगांवकर, सानिका तांबे, मंजिरी सादये, मानसी चव्हाण, प्रांजली लाड, श्रावणी गुरूदास जिकमडे यांनी सहभाग घेतला. संगीत साथ साहिल लाड, श्रवण बाईत, भावेश पालांडे या विद्यार्थ्यांनी केली. यावेळी उपाध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, मुख्याध्यापक अंकुश वळंजू, शिक्षक संभाजी कांबळे, दिनेश सावंत, महादेव पवार आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश सावंत यांनी केले. स्वागत व आभारप्रदर्शन महादेव पवार यांनी केले.
