देवगड नांदगाव मार्गावरील धोकादायक झाडे कटिंग केल्याने वाहन चालकात समाधान…

⚡देवगड ता.२८-: देवगड निपाणी हा महत्त्वाचा मार्ग आहे देवगड देवगड नांदगाव मार्गावर शिरगाव परिसरात मुख्य रस्त्यालगत अनेक वडासहित अनेक धोकादायक झाडे होती ही झाडे अतिवृष्टीमुळे पडून वाहतुकीचा खोळंबा होत होता. इतर झाडेही धोकादायक परिस्थितीत होती. येथील वाहन चालक व ग्रामस्थांनी या धोकादायक झाडे तोडण्यात यावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती.
त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामस्थांच्या व वाहन चालकांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत झाडे उन्मळून पडून वाहतूक मार्ग बंद होऊ नये. यासाठी देवगड नांदगाव मार्गावरील शिरगाव येथील रस्त्यात असलेली धोकादायक सर्व झाडे जेसीबी , व मशीनच्या सहाय्याने कटिंग करून रस्ता मोकळा केला. यामुळे वाहन चालक व तेथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.


सार्वजनिक बांधकाम विभाग कांकवलीचे सहाय्यक सिव्हील इंजिनियर सतीश खोसे यांनी स्वतः स्पॉटवर जात सर्व धोकादायक झाडे कटिंग करून घेतली. यावेळी रामचंद्र जानकर अमोल धुरी दीपक धुरी कृष्णा अधुरी रितेश धुरी बाळकृष्ण धुरी संतोष साळसकर संतोष बगाड लक्ष्मण जानकर आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page