कुडाळ रोटरी क्लब कडून तुळसुली विद्यालयाला 400 फळझाडे…

“डाकोजू धन्यवाद” उपक्रमांतर्गत वाटप

⚡कुडाळ ता.२८-: शासनाच्या शिक्षण सप्ताह उपक्रमाच्या समारोप दिवशी रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून “डाकोजू धन्यवाद ” उपक्रमांतर्गत लिंगेश्वर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली येथील शालेय विद्यार्थ्यांना 400 फळझाडे वाटप कार्यक्रम लिंगेश्वर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय तुळसूली येथे करण्यात आले.


यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष डाॅ संजय केसरे, इव्हेंट चेअरमन गजानन कांदळगावकर, इव्हेंट को-ऑर्डिनेटर राजन बोभाटे, सेक्रेटरी राजीव पवार, खजिनदार मकरंद नाईक, माजी अध्यक्ष सचिन मदने ,संस्था चेअरमन श्री के के वारंग, शा. व्य. स. सल्लागार ज्ञानेश्वर माईणकर, प्रभारी मुख्याध्यापिका सौ मनाली नाईक, शा.व्य.स उपाध्यक्ष प्रविण वारंग , सहशिक्षक अनिल वारंग, सौ मानसी वारंग, विलास राठोड , रामदास सावंत, रामदास गावडे, उत्कर्षा तायशेटये, स्वरूप यादव, अमर राठोड, सहदेव भोई , शिक्षकेतर कर्मचारी संतोष वारंग, पंढरी जाधव ,प्रसाद धुरी, पालक संतोष तुळसूलकर, श्रीम. जाधव आदी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ बेंगलोरचे प्रसिद्ध व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्तिमत्व रविशंकर डाकोजू यांच्या “डाकोजू धन्यवाद” उपक्रमाबाबत माजी असिस्टंट गव्हर्नर राजन बोभाटे यांनी शालेय विद्यार्थ्यांना माहिती दिली. गोवा व सिंधुदुर्ग साठी रविशंकर डाकोजू यांनी पाच वर्षात 1 लाख फळझाडे मोफत देण्याचा “डाकोजू धन्यवाद” उपक्रम सुरू केला असून रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लब, शाळा , महाविद्यालये , शेतकरी आदींना यावर्षी 13 हजार 500 फळझाडे वाटप करण्यात आली. पृथ्वीवरील प्रचंड वृक्षतोडीमुळे ग्लोबल वाॅर्मिंगसारखा पोलिओ धरणीमातेला लागलेला आहे. तो दूर करण्यासाठी सदर उपक्रम सुरू केलेला आहे. असेही बोभाटे यांनी सांगितले.
” डाकोजू धन्यवाद” या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळा काॅलेज शेतकरी आदींना वाटप करण्यात आलेल्या 13 हजार 500 फळझाडांचे रोटरी क्लब ऑफ कुडाळ मार्फत वर्षभरात निरिक्षण केले जाणार असून जास्तीत जास्त फळझाडे यशस्वी जगवणाऱ्याला रू.5 हजाराचे प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात येणार असल्याचे इव्हेंट चेअरमन गजानन कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.
तुळसुली हायस्कुलच्या दोन विद्यार्थी कु.अंश गवंडे व कु.आदेश बेग याना रोटरी क्लब ऑफ कुडाळचे खजिनदार मकरंद नाईक यांचेमार्फत गणवेश वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन रामदास सावंत तर प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापिका सौ मनाली नाईक यांनी केले.

You cannot copy content of this page