सुभाष तांबे यांचे आंदोलन स्थगित….

बीडीओच्या लेखी आश्वासनानंतर निर्णय;देवगड प स समोर कुटुंबियांसोबत सुरु होते आंदोलन

देवगड ः प्रतिनिधी ग्रामपंचायतीमध्ये कामावर हजर करून घेण्याचे लेखी आदेशाचे पत्र गटविकास अधिकारी यांनी दिल्यानंतर माेंड येथील सुभाष विकास तांबे यांनी पं.स.कार्यालयासमाेर साेमवारी कुटूंबियांसमवेत सुरू केलेले आमरण उपाेषण स्थगित केले. माेंड ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साई कर्मचारी पदावर कार्यरत असलेल्या सुभाष विश्राम तांबे यांनी या पदावर हजर करून घेत नसल्याबाबत कुटूंबियांसमवेत पं.स.कार्यालयसमाेर उपाेषणाला बसण्याचे पत्र गटविकास अधिकारी यांना दिले हाेते. त्यानुसार साेमवारी तांबे हे पत्नी व मुलीसमवेत पं.स.कार्यालयासमाेर उपाेषणाला बसले.त्यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या पत्रात आकृतीबंधात साई कामगार हे पद देवून ग्रा.पं.ने \सवणूक केली.ग्रा.पं.चे काम करीत असताना माेटरसायकल अपघात हाेवून पायाला दुखापत झाली हाेती.पायाची दुखापत झाल्यानंतर ग्रा.पं.कार्यालयात हजर करून घेणेबाबत अर्ज सादर केला.तसेच जिल्हा रूग्णालयाचे साई कर्मचारी पदावर काम करणेस सक्षम असल्याचे पत्रही दिले मात्र ग्रा.पं.प्रशासनाने साई कामगार हे पद आकृतीबंधात नसल्याने हजर करून घेण्याचा प्रश्नच नाही असे पत्र दिले.ग्रामपंचायतीने साई कर्मचारी पद देवून \सवणुक केली.या झालेल्या अन्यायाबाबत न्याय मिळावा यासाठी वारंवार मागणी करूनही न्याय न मिळाल्याने गटविकास अधिकारी पं.स.कार्यालयासमाेर उपाेषणला बसत असल्याचे पत्र दिले हाेते. त्यानुसार साेमवारी त्यांनी कुटूंबियांसमवेत उपाेषण सुरू केले.अखेर सभापती लक्ष्मण उ\र् रवी पाळेकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक पाेलिस निरिक्षक संजय कातिवले यांच्या उपस्थितीत माेंड ग्रामपंचायतीने तांबे यांना तात्काळ कामावर हजर करून घ्यावे असे लेखी पत्र दिल्यानंतर त्यांनी उपाेषण स्थगित केले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संताेष किंजवडेकर, महेंद्र माणगावकर, तसेच माेंडमधील ग्रामस्थ उपस्थित हाेते.

You cannot copy content of this page