स्वबळाची घोषणा केली तरी सूत्र ठरलय,विद्यमान आमदारांनाच उमेदवारी देणार…

मंत्री दीपक केसरकर:कुडाळात उमेदवारीवरून वाद होणार नाही यासाठी प्रयत्न करणार..

⚡सावंतवाडी ता.२७-:  ज्या मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार आहे तिथे त्या ठिकाणी त्या त्या पक्षाला उमेदवारी दिली जाणार असून स्वबळाची घोषणा केली असली तरी हे सूत्र ठरलेले आहे त्यामुळे कुठलाही वाद होणार नाही अशी प्रतिक्रिया शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज इथे दिली.

दरम्यान कुडाळ येथेही वाद होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. श्री केसरकर आज सावंतवाडी मतदार संघाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

You cannot copy content of this page