मंत्री दिपक केसरकर:सिंधुरत्न मधून ३७ हजार बॅनिफिशरना वेगवेगळ्या योजनातून लाभ झाला..
⚡सावंतवाडी ता.२७-: फांदी पडून मृत्यूमुखी पडलेल्या तळवडेतील त्या मुलीला चार लाख रूपये नुकसान भरपाई देण्यत येणार आहे तर वेंगुर्ल्यात त्या अपघातात मरण पावलेल्या त्या वीजवितरण च्या कर्मचारी वर्गाच्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी संदर्भात विचार सुरू असल्याचे दिपक केसरकर यांनी आज येथे सांगितले.
दरम्यान सिंधुरत्न मधून आतापर्यंत ३७ हजार बॅनिफिशरना वेगवेगळ्या योजनातून लाभ झाला आहे.ही ही संख्या आतापर्यंत सर्वात मोठी आहे.पर्यटनास शेतीच्य योजनांचा फायदा यातून होणार असल्याचे दिपक केसरकर म्हणाले.
