कणकवली उपजिल्हा रुग्णालये निकृष्ट आहाराची चौकशी व्हावी

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे जिल्हधिकाऱ्यांना निवेदन

ओरोस प्रतिनिधी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड सेंटर मधील रुग्णांना निकृष्ट दर्जाचा आहार पुरविले जात असल्याकडे आज जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी यांचे लक्ष वेधले आहे. तसेच या निकृष्ट आहार पुरवठयाबाबत ची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथील कोरोना रुग्णांसाठी जेवण व त्या अनुषंगीक वितरीत केला जाणारा आहार निकृष्ट असलेबाबत रुग्णांच्या तक्रारी येत आहेत. याबाबतची माहिती घेतली असता ,सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक यांनी हा आहार कणकवली तहसिलदार यांच्या यंत्रणेकडून वितरीत केला जात असल्याची बाब स्पष्ट केली. तर तहसिलदार कणकवली यांनी सदरचा आहार हा आपले यंत्रणेकडून पुरविला जात नसुन उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांचे कडूनच पुरविला जात असल्याचे चौकशीअंती सांगीतले. वास्तविक पहाता कोरोना रुग्ण यांच्या तब्येतीच्या दृष्टिने सकस आहार पुरविणेबाबत निर्देश असताना देखील आहार वितरीत करणा-या व्यवस्थेकडून निकृष्ठ प्रकारचा आहार वितरीत होत आहे. यामुळे कोरोना रुग्ण दगावण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. त्यामुळे याबाबत आज जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, माजी जिप अध्यक्षा रेश्मा सावंत, सभापती शर्वांनी गावकर, महेंद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी यांची भेट घेत निवेदन सादर केले तसेच जिल्हातील उपजिल्हा रुग्णालय,तहसिलदार व कोरोना रुग्णांना आहार पुरविणा-या यंत्रणा यांना समन्वयाने यातील त्रुटी दूर करण्याच्या सुचना दयाव्यात. तसेच या निकृष्ट आहार पुरवठयाबाबत ची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. फोटो ओळ –

You cannot copy content of this page