मंत्री केसरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांना आदेश: दोडामार्ग वीज प्रश्न संदर्भात लवकर मुंबईत बैठक घेऊन कायमचा मिटवला जाईल..
⚡सावंतवाडी ता.२७-: जे अधिकारी हलगर्जीपणा करत आहेत त्यांच्यावर कारवाई अटळ आहे जे वीज अधिकारी असं वागतील त्यांच्यावर कारवाई करा असे सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आजच्या बैठकीत दिल्या.
दरम्यान एकाही गावात वीज खंडित राहता कामा नये तात्काळ वीस पुरवठा सुरळीत करा दोडामार्ग भागातील वीज प्रश्न संदर्भात मुंबई त मुख्यमंत्री व वीज विभागाचे चेअरमन यांच्या समवेत बैठक घेऊन तेथील प्रश्न कायमचा मिटवला जाईल असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. श्री केसरकर यांचे अध्यक्षखाली आज सावंतवाडीत अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.
दरम्यान जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी वीज अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तुम्हाला गावे दाखवायचे का कुठल्या गावात वीज पुरवठा खंडित आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश गावात वीज. पुरवठा खंडित आहे तो दुरुस्त करा मॅनपावर चा प्रश्न सांगू नका असेही त्यांनी स्पष्ट केले.
