काँक्रीट न घातल्यास आंदोलन उभारू…

प्रशांत बांदेकर:गाडगेवाडीतील लोकांना खड्ड्यातून कसरत करावी लागते..

बांदा/प्रतिनिधी
जलजीवन योजने अंतर्गत बांदा शहरातील गडगेवाडी येथे नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. खोदकाम करतेवेळी कॉक्रीट घालून देणार असे आश्वासन जलजीवनच्या ठेकेदाराने दिले होते. मात्र अद्यापपर्यंत कॉक्रीट घालून देण्यात आले नाही. त्यामुळे यासंदर्भात तात्काळ कार्यवाही न झाल्यास प्रसंगी जनआंदोलन उभारून ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी दिला आहे.
जलजीवनचे काम सुरु होऊन दीड वर्षे झाली आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे गडगेवाडीतील लोकांना खड्ड्यातून कसरत करत जावे लागते. याविषयी बांदा ग्रामसभेत जलजीवन कामासंबंधीच्या विषयावेळी सदर काम लवकरात लवकर ठेकेदाराने करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी केली आहे. अन्यथा जनआंदोलन उभारून सदर कामाची तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page