⚡सावंतवाडी ता.२५-: महाराष्ट्र राज्याचे लाडके शालेय शिक्षण व मराठी भाषा नामदार दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे २६ जुलै ते 28 जुलै या कालावधीत भव्य भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सुश्राव्य संगीत भजनांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.सदर महोत्सवाचे उद्घाटन श्री.
दिपकभाई केसरकर,शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य व सौ.पल्लवीताई केसरकर, माजी नगराध्यक्ष,सावंतवाडी यांच्या हस्ते दिनांक 26 जुलै 2024 रोजी सायंकाळी ठीक 4.00 वाजता होणार आहे.
तरी दिपकभाई केसरकर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच शिवसेना पक्षाचे तीनही तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने वेळेत उपस्थित राहावे. कार्यक्रमाची शोभा वाढवावी व भजनांचा आस्वाद घ्यावा.
या स्पर्धेमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील नावाजलेल्या भजनी मंडळाची भजने सादर होणार आहेत. तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भजनांचा आस्वाद घ्यावा ही विनंती. दिपकभाई केसरकर मित्र मंडळ सावंतवाडी व शिवसेना सावंतवाडी
