मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची सर्वेनुसार संख्या १८९०४ त्यातील ३५२ उमेदवार अपात्र-: विलास साळसकर…

देवगड (प्रतिनिधी)२५ जुलै २०२४
देवगड तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे सर्वेनुसार एकूण १८ हजार ९०४ लाभार्थी असून यामधील ३५२ लाभार्थी हे अपत्र ठरले असल्याची माहिती शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी दिली.


शासनाने महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे देवगड देवगड तालुक्यामधील काम हे देवगड मधील एकात्मिक बालविकास सेवा मंडळ, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, ग्रामसेवक सरपंच व इतर सर्व जण या योजनेचे देवगड तालुक्यात वाखाण्याजोगे काम करत आहेत.देवगड तालुक्यातील एकूण मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संख्या सर्वेनुसार १८९०४ असून यामध्ये ३५२ अर्ज अपात्र उमेदवार ठरले आहेत. तसेच offline एकूण अर्ज १४९१३ प्राप्त झाले त्यापैकी online पूर्ण झालेली संख्या १३२५१ असून online करावयाचे शिल्लक १६६२ बाकी आहेत.तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अद्यापही ज्या लाभार्थी मंडळींनी अर्ज भरले नाहीत.त्याचा तपास सुरू आहे.त्यांनी संबंधित गावातील ग्रामपंचायत , अंगणवाडी सेविका यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन शिंदे गट शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी केले आहे.
देवगड तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काम समाधानकारक केल्याबद्दल शिंदे गट शिवसेना पक्षाच्या वतीने या सर्व यंत्रणेचे आम्ही विशेष आभार व्यक्त करत आहोत.असेही साळसकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page