निवडणुकीच्या तोंडावर केसरकर यांचा “भुलभुलय्या पार्ट फोर” सुरू झालाय…

रुपेश राऊळ:पक्षातून येणाऱ्या निश्चितच स्वागत;पण आयात उमेदवार देऊ नये ही आमची मागणी..

⚡सावंतवाडी ता.२२-: प्रॉपर्टी विकून जिल्ह्याचा विकास करणार असे म्हणणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री केसरकारांनी अगोदर पंधरा वर्षात केलेल्या घोषणा आणि आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रॉपर्टी विकावी तर निवडणुकीच्या तोंडावर केसरकर यांचा भुलभुलय्या पार्ट फोर सुरू झाल्याची टीका शिवसेना तालुकाप्रमुख श्री रुपेश राऊळ यांनी आज येथे केली.

दरम्यान पक्षातून येणाऱ्याचे आम्ही निश्चितच स्वागत करणार आहोत. परंतू कुठलाही आयात उमेदवार या ठिकाणी देण्यात येऊ नये अशी मागणी आमची आहे स्थानिक पातळीवर निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी देण्यात यावी जेणेकरून भविष्यात कुठलीही गद्दारी होऊ नये असे सर्वांचे म्हणणे आहे.

You cannot copy content of this page