दलित यूथ पॅथर्स प्रदेश अध्यक्ष जाधव यांचा आरोप
*💫सावंतवाडी दि.०५-:* येथे डिक्री केलेल्या जागेत असलेले इतर गाळ्यांवर कारवाई न करता अनुसूचित जातीच्या असलेल्या रवी जाधव यांच्या गाळ्यांवर कारवाई करत जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सावंतवाडी नगरपालिका प्रशासन करत असल्याचा आरोप दलित युथ पँथर्स महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दादासाहेब जाधव यांनी केला आहे. पालिका प्रशासनाला कारवाई करायचीच होती तर सरसकट सगळ्या गाळ्यावर का नाही केली असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यावेळी जो गाळा पालिका प्रशासनाने काढला तो आपण पुन्हा लावत असून, हिम्मत असेल तर त्या गाळ्याला हात लावून दाखवावा. असा इशारा त्यांनी सावंतवाडी मुख्याधिकारी जावडेकर यांना दिला आहे. रवी जाधव यांचा गाळ्यास पुन्हा हात लावल्यास महाराष्ट्रात जो उद्रेक होईल त्याला सर्वस्वी येथील मुख्याधिकारी जावडेकर जबाबदार राहतील असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. अन्याय सहन करण्याचे कॉन्ट्रॅक्ट आपण केले नसून, अन्याय सहन करणार नाही. असा इशारा दादासाहेब जाधव यांनी दिला आहे. यावेळी दलित युथ पँथर्स महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाईसाहेब जाधव, कोकण प्रदेश अध्यक्ष विजय जाधव, रायगड जिल्हा महासचिव निखिल, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विश्वास कांबळे, कोल्हापूर संपर्क प्रमुख राजू वायदंडे, कोल्हापूर युवा संपर्क प्रमुख दयानंद शिरोळीकर, माजी नगरसेवक तानाजी वाडकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, माजी नगरसेवक सुनील पेडणेकर, समीर वंजारी, रवी जाधव आदी उपस्थित होते.
