धुरीवाडा येथे कोसळलेला माड सहकाऱ्यांच्या मदतीने तात्काळ हटवला…
⚡मालवण ता.२०-: मालवण धुरीवाडा येथे वीज वाहिन्यांसह कोसळलेला माड माजी नगरसेवक यतीन खोत व सहकाऱ्यांनी हटविण्याची कार्यवाही केली. मुसळधार पावसाने मालवणात अनेक ठिकाणी पडझड सूरूच आहे. मात्र या आपत्तीस्थितीत माजी नगरसेवक यतीन खोत भर पावसातही मदत कार्यासाठी तत्पर असल्याचे अनेक प्रसंगातून सातत्याने दिसून आले आहे.
धुरीवाडा येथे माड वीज वाहिन्यासह रस्त्यावर धोकादायक स्थितीत कोसळला. याबाबत माहिती मिळताच यतीन खोत तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. वीज वितरणला माहिती देऊन कर्मचारी यांना बोलावले. तसेच सहकारी बाळ तुरी, हनुमंत तोंडवळकर, उमेश परब, विनू परब, संदेश शिरगावकर, विकी माळगावकर, बाळा यांसह अन्य सहकारी यांच्या मदतीने माड तोडून हटवला. वीज जोडणीही करून घेतली.
