धक्का मित्रमंडळाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.१८-: मालवण येथील धक्का मित्रमंडळाच्या वतीने मामा वारेरकर नाट्यगृह येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

एक हात मदतीचा असे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक कार्य करणाऱ्या धक्का मित्रमंडळ या ग्रुपतर्फे कोरोना महामारी काळापासून रक्तदानाची गरज ओळखून रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत. आता पर्यंत धक्का मित्रमंडळातर्फे आठ रक्तदान शिबीरे घेण्यात आली असून नववे रक्तदान शिबीर आज मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन मालवणचे वाहतूक पोलीस गुरूदास परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या शिबिराला रक्त दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच यासाठी जिल्हा रक्तपेढीच्या डॉक्टर व परिचारिका यांचे सहकार्य लाभले.

यावेळी बाबू डायस, हेमंत शिरगांवकर, नितेश जाधव, देवा तोडणकर, भूषण पिसे, गौरेश कांबळी, विशाल आपकर, नितीन कोटीयान, संजय गावडे, अनिकेत चव्हाण, रोहित चव्हाण, शंकर पाटकर, राहुल केळूसकर, शर्मिला गावकर, स्वप्नील कदम, ललित चव्हाण आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page