तळगाव येथील आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद…

⚡मालवण ता.१८-: एसएसपीएम लाईफटाइम हॉस्पिटल, पडवे आणि तळगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने व भाजपा पदाधिकारी व जिल्हा नाभिक संघटना अध्यक्ष श्री. जगदीश चव्हाण यांच्या प्रेरणेने तळगाव ग्रामपंचायत येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिरात ५० पेक्षा जास्त लोकांनी तपासणी करून औषधे व मार्गदर्शन घेतले.

यावेळी एसएसपीएम मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमही ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी एसएसपीएमचे डॉक्टर, पदाधिकारी व विद्यार्थी यांचे स्वागत तळगावचे उपसरपंच संतोष पेडणेकर व सदस्य अनंत चव्हाण आणि ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांनी केले. ग्रामसेवक सौ. शेलटकर यांनी सर्व डॉक्टर पदाधिकारी, परिचारिका यांचे आभार मानले. यावेळी तळगाव सोसायटीचे सेक्रेटरी चेतन तळगावकर, कर्मचारी वंदना दळवी, यशवंत ताळगवकर, नंदकुमार दळवी, सतीश सावंत आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page