लहान गटात कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या कु. चिन्मय कोटणीस प्रथम तर मोठ्या गटात नेमळे हायस्कूलच्या कु. साक्षी मोहन दळवी प्रथम..
⚡सावंतवाडी ता.१८-:
सावंतवाडी येथील सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलने स्व.राजमाता सत्वशीलादेवी भोंसले यांच्या ६ व्या पुण्यस्मरणार्थ आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात सावंतवाडीच्या कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या कु. चिन्मय विक्रम कोटणीस (इ. ७वी) हिने तर मोठ्या गटात नेमळे हायस्कूलच्या कु. साक्षी मोहन दळवी (इ. ८वी) हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
या कार्यक्रमात राजमातांच्या प्रतिमापूजनानंतर उपस्थित मान्यवरांनी राजमातांच्या स्मृतींना उजाळा दिला. या स्पर्धेत जिल्हयातील विविध शाळांमधून लहान गटात एकूण १९ विद्यार्थी तर मोठ्या गटात एकूण २२ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पधेचे परीक्षण प्रा. माणिक बर्गे, प्रा. कविता तळेकर, प्रा. सुप्रिया केसरकर व प्रा. हर्षदा परब यांनी केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संस्था सदस्य जयप्रकाश सावंत, मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा उर्वरीत निकाल पुढीलप्रमाणे ५वी ते ७वी लहान गट प्रथम क्रमांक कु. चिन्मय विक्रम कोटणीस (इ. ७वी) कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी, द्वितीय क्रमांक कु. गायत्री शशिकांत सावंत (इ. ७वी) श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव, तृतीय क्रमांक कु. हर्षदा गणेश जोशी (इ. ६वी) गजानन विदयालय, पाट कुडाळ ८ वी ते १० वी मोठा गट प्रथम क्रमांक कु. साक्षी मोहन दळवी (इ. ८वी) नेमळे हायस्कूल, द्वितीय क्रमांक कु. अस्मि प्रविण मांजरेकर (इ. ९वी) राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी व तृतीय क्रमांक कु. युक्ता प्रसाद सापळे (इ. १० वी) मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी
स्पर्धेचे प्रास्ताविक अस्मिता परब, सूत्रसंचालन श्रृती जोशी तर आभार रमणी गावडे आणि गोविंद प्रभू यांनी मानले. सर्व सहभागी व विजेत्या स्पर्धकांचे सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व संस्थेचे सदस्य, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी व पालक शिक्षक संघ व माता पालक संघ कार्यकारी समितीच्या सदस्यांनी अभिनंदन केले.
