⚡देवगड ता.१६-: देवगड तालुक्यात पावसाची संंतप्तधार ही सुरूच असून मंगळवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पडझड होऊन तालुक्यात सुमारे २ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
देवगड तालुक्यात १६७ मीमी इतक्या पावसाची नोंद असून आतापर्यंत तालुक्यात १८६२ मिमी इतकी नोंद आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील आडबंदर येथील विलास जनार्दन सनये यांच्या घरानजिक असलेली संरक्षक भिंत घरावर कोसळल्याने घराच्या भिंतींना भेगा पडून सुमारे २ लाख नुकसान झाले आहे.पावसाचा जोर अधून मधून सुरूच असून शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेडअलर्ट दिला आहे.बुधवार दि १७ रोजी आषाढी एकादशी असल्याने मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देवगडात तालुक्यात अतिवृष्टीमुळे सुमारे दोन लाखाचे नुकसान ; १६७ मिमी पाऊस…
